बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाड्याचं टेंशन वाढलं! ‘या’ शहरात आढळला Omicronचा रूग्ण

लातूर | कोरोनाचा नवा व्हेरियंट Omicron सध्या जगभर धुमाकूळ घालताना दिसत आहे. अशातच आता महाराष्ट्रात देखील Omicron ची एन्ट्री झाली. सध्या राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 20 वर पोहचली आहे. अशातच आता मराठवाड्याची चिंता वाढवणारी माहिती आता समोर आली आहे.

आज दिवसभरात Omicron व्हेरियंटचे दोन रूग्ण आढळले आहेत. त्यातील एक रूग्ण हा लातूरमध्ये आढळला आहे. तर दुसरा रुग्ण पुण्यात सापडला आहे. या दोन्ही रूग्णांना आयसोलेट करण्यात आलं असून त्यांच्या उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची देखील टेस्ट करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 5 रूग्ण आहेत, पिंपरी चिंचवडमध्ये हा आकडा 10वर पोहचला आहे. तर पुणे मनपा क्षेत्रात 2 रूग्ण हे ओमिक्राॅनचे आहेत. तसेच कल्याण डोंबिवलीत 1 रूग्ण आहे. त्याचबरोबर नागपूरमध्ये 1 आणि लातूरमध्ये 1 रूग्ण आहे.

दरम्यान, नुकतीच ओमिक्राॅनविषयी धक्कादायक माहिती समोर आली होती. Omicron मुळे इंग्लंडमधील एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार देखील सतर्क झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

“जेव्हा औरंगजेब येतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात”

श्रीनगरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, 14 जवान जखमी तर 5 गंभीर

शरद पवारांना मोठा धक्का! राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचा पक्षाला रामराम

“एवढं तरी वाचायला हवं, इतकं बावळट असून चालत नाही”

टेंशन वाढलं! Omicron बाधित रूग्णाचा मृत्यू, खुद्द पंतप्रधानांनी केला खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More