नवी दिल्ली | कोरोनाच्या (Corona) महासाथीनं सगळं वातावरण भीतीचं करुन सोडलं होतं. संपूर्ण जगावर या महामारीचे पडसाद दिसत होते. अशातच आता ही कोरोनाची लाट हळूहळू शिथील होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे. दिलासादायक वातावरण होताच आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्रात अनलाॅक करण्यात आलं असून सगळे निर्बंध हटवण्यात आले आहेत. असातच चीनमध्ये (China) मात्र उलटी परिस्थिती पहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या शिरकावामुळे लाॅकडाऊन (Lockdown) लावण्याची वेळ ओढवली आहे.
चीनमध्ये करोनाचा नवा उपप्रकार आढळला आहे. हा उपप्रकार ओमिक्रॉन व्हेरियंटचा आहे. यामुळे चीनमध्ये एका दिवसात 13 हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचं पहायला मिळत आहे. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहे. कोरोनाचे नवे व्हेरियंट तयार होत असून त्यामुळे संसर्ग वाढत आहे.
दरम्यान, शांघाय शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्यात आला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट नियंत्रणात ठेवण्यासाठी 28 मार्चला लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यातच आता पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे.
थो़डक्यात बातम्या –
‘शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे’; मनसेचा घणाघात
Jio च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज, कंपनीने केली या जबरदस्त प्लॅनची घोषणा
मोठी बातमी! HDFC ने केली अत्यंत महत्त्वाची घोषणा
“…अन् तिथेच राज ठाकरेंसारख्या फायरब्रँड नेत्याचं फ्लॉवर झालं”
विराट-अनुष्काकडे आहे ‘इतकी’ संपत्ती; आकडा वाचून थक्क व्हाल
Comments are closed.