बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मथुरेत तणावाचं वातावरण, शहरात कलम 144 लागू

मथुरा | देशात कधी कोणत्या गोष्टीवरून वाद सुरू होतील हे सांगता येत नाही. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) हे राजकीय तसेच धार्मिक वादविवादासाठी सुद्धा ओळखलं जातं. प्रसिद्ध बाबरी मस्जिद (Babri Maszid) वादाच्या पाऊलखुणा अजून जिवंत आहेत. अशातच आता मथुरा (Mathura) येथील मस्जिदीवरून नवा वाद निर्माणा झाला आहे. परिणामी सध्या उत्तर प्रदेश सरकारनं (UP Government) मथुरेमध्ये हाल अलर्ट (High Alert) जारी केली आहे.

गत महिन्यात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या नेत्या राजश्री चौधरी यांनी 6 डिसेंबर रोजी मथुरेच्या शाही मस्जिदीमध्ये भगवान कृष्णाची मुर्ती बसवून जलाभिषेक करण्याची घोषणा केली होती. परिणामी मथुरेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. चौधरी यांच्या वक्तव्याला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्य यांनी समर्थन दिल्यानं सर्वत्र खळबळ माजली होती.

शाही मस्जिदीमध्ये भगवान श्रीकृष्णाची मुर्ती पुरातण काळापासून होती. आणि आम्ही त्या जागेवर ती प्रतिष्ठापणा करणार या हिंदू महासभेच्या भूमिकेमुळं योगी सरकारनं मथुरेतील सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मथुरा शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मथुरेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, शाही मस्जिद आणि भगवान श्रीकृष्ण मंदीर वाद हा फार जुना आहे. एकूण 13 एकर जमीनीचा हा वाद सध्या न्यायालयात आहे. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारला उत्तर प्रदेश शांत ठेवण्यासाठी आता अडचणीचा सामना करावा लागत आहे.

थोडक्यात बातम्या 

“सावरकरांना वैज्ञानिक दृष्टीकोन होता, भाजपने विनाकारण…”

“एक बाई उठते अन् तिला…”, बाळासाहेब थोरातांनी घेतला समाचार

Omicron वाढतोय, शाळा सुरू होणार का?; वर्षा गायकवाड म्हणतात…

शिवेंद्रराजेंना धक्का! शरद पवारांच्या एका मताने शिवेंद्रराजेंचा पत्ता कट

‘कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर..’; रावसाहेब दानवेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More