“…अन् राष्ट्रवादीचा सदस्य आमच्या छातीवर नाचतो”; शिवसेना आमदाराचं वक्तव्य
मुंबई | महाविकास आघाडीच्या (MVA) माध्यमातून शिवसेनेनं (Shivsena) सत्तेची सुत्र आपल्या हातात ठेवण्यात यश मिळवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakeray) यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्याच्या कारभार चालतो. पण शिवसेनेच्या आमदारांनी मात्र सातत्यानं नाराजी वर्तवली आहे.
शिवसेना आमदार माजी मंत्री तानाजी सावंत (Shivsena MLA Tanaji Sawant) यांनी भर सभेत आमच्यावर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीचा (NCP) ग्रामपंचायत सदस्य देखील कोटींचा निधी आणतो आणि आमच्या छाताडावर नाचतो, असं वक्तव्य सावंत यांनी केलंय.
आम्हाला केवळ गोड बोलण्यात येतं. राज्याच्या अर्थसंकल्पात देखील आमच्यावर अन्याय करण्यात आला. राष्ट्रवादीच्या वाट्याला 60-70 टक्के, काॅंग्रेसला 30-35 टक्के, शिवसेनेला केवळ 15-20 टक्के निधी मिळतो, असा आरोप सावंत यांनी केला आहे.
दरम्यान, शिवसेना आमदार सातत्यानं अर्थमंत्री अजित पवार निधी वाटपात भेदभाव करत असल्याचं वक्तव्य करत आहेत. परिणामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विषयाकडं कसं पाहतात ते महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
तालिबानचा नवा फतवा! आता महिला-पुरूषांना उद्यानात सोबत फिरण्यास बंदी
मुलींची ‘ही’ पाच सिक्रेट मुलांना माहित असावी, नक्कीच होईल फायदा
शाळकरी मुलांसाठी शिक्षण विभागानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
धमाका होणार! ‘KGF Chapter2’ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
“आमदारांना घरे देऊ नयेत”; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Comments are closed.