बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भीषण अपघात! बस आणि ट्रकच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू, 27 जण रुग्णालयात

लखनऊ | उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे भयानक अपघात झाला आहे. या अपघातात डबल डेकर बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. अपघातात जागीच 11 जणांचा मृत्यू झाला असून 27 जणांना दुखापत झाली आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल कऱण्यात आलंय.

या भीषण अपघातात दोन्ही गाड्यांची अवस्था खूपच भयानक झाली आहे. अपघाताविषयी योगी आदित्यानाथ यांनीही शोक व्यक्त केलाय. याशिवाय त्यांनी शक्य तितकी मदत करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

गायीला वाचवण्याच्या नादात डबल डेकरच्या चालकानं समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातात तर ट्रकचा चेंदामेंदा झालेला पहायला मिळाला. डबलडेकर बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या अपघातामुळे मोठा झटका बसला. अपघातानंतर वाहन चालकानं घटनास्थळावरून पळ काढला.

अपघातानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीनं नागरिकांनी जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल केलं.

 

थोडक्यात बातम्या – 

नरेंद्र मोदींनी वाहिली नटू काकांना श्रद्धांजली, जुना फोटो शेअर करत म्हणाले….

केंद्र सरकारकडून ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा बोनस जाहीर

जि.प आणि पंचायत समिती निवडणूक निकालावर अजित पवारांनी व्यक्त केल्या भावना, म्हणाले…

दिलासादायक! कोरोना लसीनंतर आता येणार ‘या’ साथीच्या रोगाची लस

आर्यन खान घरी जाणार की रवानगी पुन्हा कोठडीत होणार? आज होणार निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More