वर्धा | दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असताना एक ह्रदयद्रावर घटना घडली आहे. भरदाव वेगात येणारी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला धडकल्याने वर्धा जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे.
दुचाकीवर दोघे जण रसुलाबादच्या दिशेने जाताना हिवरा शिवार परिसरात दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी थेट जाऊन रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
दुचाकी आणि ट्रकची धडक जोरात झाल्याने ती दुचाकी ट्रकमध्ये अडकली. त्यामुळे या दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सचिन कनेरी आणि सुरज ढोले अशी या अपघातातील मृतांची नावं आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पुलगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी या प्रकरणातील पुढील तपासाला देखील सुरूवात केली आहे.
थोडक्यात बातम्या-
“भाजपला दूध दिसत नाही, शेण दिसतं, त्यांचा दृष्टीकोनच तसा आहे”
मेरा यही अंदाज ज़माने को खलता है, संजय राऊतांचं नवं ट्विट चर्चेत
ना परिक्षा ना मुलाखत, पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार ‘इतका’ पगार
…अन् भाजप नगरसेवकाने लावले अजित दादांच्या आभाराचे बॅनर्स
‘आता यापेक्षा जास्त बोलायचं नाही, बस झालं’, राऊतांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Comments are closed.