आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात; गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली

पुणे | भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या गाडीला भीषण अपघात झालाय. या अपघातात जयकुमार गोरे यांना गंभीर दुखापत झाली आहे.

गोरेंना पुण्यातील रुबी रुग्णालयात आणण्यात आलं आहे. जयकुमार गोरे यांची प्रकृती सध्या कशी आहे? याबाबत डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

जयकुमार गोरे यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार केले जात आहेत. ते शुद्धीवर आहेत.

जयकुमार गोरे यांच्या छातीला, पाठीला आणि हाताला दुखापत झाली आहे. त्यांना आधी साताऱ्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात हलवण्यात आलं.

पहाटे 3 वाजून 30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. आमदार गोरे यांच्या फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-