बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसी दुरुस्त करण्यासाठी आलेल्या दोघांसोबत भयानक प्रकार, गुप्तांगावर पेट्रोल टाकून…

चंदिगड | फरिदाबाद येथे अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. मामा-भाच्याला एसी दुरुस्त करण्याचं कारण सांगून बोलावून घेतलं. त्यानंतर अत्यंत संतापजनक कृत्य करण्यात आलं असल्याची घटना उघडकीस आली आहे. विचित्र बाब म्हणजे या संबंधित मामा-भाच्यांच्या गुप्तांग मध्ये पेट्रोल देखील ओतण्यात आलं आहे. या घटनेनंतर दोघे अतिशय घाबरले आहेत.

संबंधित मामा- भाचे हे दोघे मुळचे उत्तर प्रदेशचे असून फरिदाबादमध्ये ते एसी दुरुस्तीचं काम करतात. काल रात्री फरिदाबाद मधील राजीव शाम काॅलिनी मधील एकाने त्यांना एसी दुरुस्ती करण्यास बोलवलं. दोघेही तेथं पोहचताच त्या दोघांना बांधून त्यांच्या तोंड रुमालनं बांधण्यात आलं. त्यानंतर त्या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यादरम्यान संबंधित आरोपीने त्यांच्या गुप्तांगमध्ये पेट्रोल देखील ओतलं.

रात्रभर दोघांना बेदम मारहाण केल्यानंतर जखमी अवस्थेत दोघेही कसेतरी आपल्या रुमवर पोहोचले. यादरम्यान त्यांच्या शोजारच्या लोकांनी त्यांना जखमी झालेलं पोहिलं. त्यानंर शेजारच्यांनी त्यांच्या घर मालकाला फोन करुन याबाबतची माहिती दिली. घर मालकाने थेट रुम गाठली आणि चौकशी केल्यानंतर दोघांनी संपुर्ण घटना सांगितली.

दरम्यान, घर मालकांनी दोघांनाही रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आता तपास चालू केला असून संबंधित आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

थोडक्यात बातम्या-

गुढीपाडव्याला घेतला होता नवाकोरा ट्रॅक्टर, बाप-लेकासाठी तोच ठरला काळ!

देवाने प्रत्येक घरात सलमानसारखा मुलगा जन्माला घालावा- राखी सावंत

“गृहमंत्री बदलूनही हफ्ते वसुली चालू असेल तर आता पर्याय काय काढणार?”

शिक्षकानं विद्यार्थिनीला दाखवला अश्लील व्हिडीओ, अत्यंत धक्कादायक प्रकारानंतर खळबळ

जिगरबाज! लहान मुलाला वाचवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं खुद्द रेल्वेमंत्र्यांनी केलं कौतुक; पाहा व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More