एके-४७ घेऊन भारतीय जवान बेपत्ता, चौकशी सुरु

श्रीनगर | प्रादेशिक सैन्याचा एक जवान बारामुल्ला गन्टमुल्ला येथील लष्करी तळावरुन एके-४७ रायफलसह बेपत्ता झाला आहे. जहूर ठाकूर असं या जवानाचं नाव आहे. तो पुलवामाचा रहिवाशी आहे. 

प्रादेशिक सैन्य हा भारतीय सैन्याचा एक भाग आहे. स्थानिक तरुणांना प्रादेशिक सैन्यात भरती करुन त्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं जातं. सैन्याला गरज पडल्यास या सैन्याला सीमेवर उतरवलं जातं.

दरम्यान, हा जवान एके-४७ रायफलसह बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडालीय.