पुणे | गजा मारणे प्रकरणानंतर पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये दिसत होते. पुण्यात गुंडांची दहशद थांबवणे आणि कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे. तरी देखील पोलिसांना पुण्यातील गुडांच्या दहशदीला आळा घालण्यात पुर्णपणे यश आलेलं दिसत नाही. पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर असाच एक प्रकार घडल्याने शहरातील गुंडगिरी पुन्हा चर्चेत आली आहे.
सिंहगड रस्त्याच्या नऱ्हे येथील पिराजी नगर परिसरात एका तडीपार गुंडाने शिवजयंतीच्या दिवशी हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्याला तडीपार करण्यात आलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असुन त्यात रोशन लोखंडेच्या हातात कोयता दिसत आहे. तर आणखी एका गुंडाच्या हातात बंदुक दिसत आहे. रोशन लोखंडे असं या गुंडांच नाव असुन त्याच्यावर याआधी शस्त्र जवळ बाळगणं, दरोडा आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याआधीही लोखंडेला तडीपार करण्यात आलं आहे. त्याची तडीपार होण्याची ही दुसरी वेळ आहे.
पिराजी नगरात सध्या दहशतीचं वातावरण आहे. झालेल्या प्रकारामुळे परिसरातील नागरिक देखील संतप्त आहेत. पोलिस योग्य ती कारवाई करत नसल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. पोलिस ठाण्याच्या परिसरात तडीपार गुंड फिरत असताना देखील पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
तडीपाराचा गुन्हा आधी गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी केला जात होता. परंतू आता हे कायदे देखील दुर्मीळ झाले असल्याने कायद्यांच्या चौकटीतून गुन्हेगार लवकर बाहेर पडतात. त्यामुळे या कायद्याचा धाक कमी होताना दिसत आहे. याला पर्याय म्हणून सरकारला नवीन कायदे करण्याची गरज आहे.
पुण्यातील सिंहगड रोड परिसरात तडीपार गुंडांची हातात तलवार घेऊन दहशत; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल pic.twitter.com/cNDhk5lxMf
— थोडक्यात (@thodkyaat) February 24, 2021
थोडक्यात बातम्या-
“महाराष्ट्राचे इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही”
धक्कादायक! साठ वर्षाच्या ‘या’ खासदाराने केलं 14 वर्षाच्या मुलीसोबत लग्न
चित्राताई ठेचतील या भीतीने नागोबा बाहेर आला- प्रसाद लाड
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड”
रायगडावर महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायचं असेल तर पाळावे लागणार ‘हे’ नियम!