Top News देश

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, भाजपच्या तीन युवा नेत्यांची गोळ्या झाडून हत्या

जम्मू काश्मीर | जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या 3 युवा नेत्यांची हत्या करण्यात आली आहे.

कुलगाममधील वायके पोरा या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये हुसैन इट्टू, उमेर राशिद बेग आणि उमेर हनान यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे.

हल्ला झाल्यानंतर या तिन्ही नेत्यांना तातडीने जवळल्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हे कृत्य दहशतवाद्यांच्या निकृष्ट प्रतिबिंब असल्याचं जम्मू-काश्मीर भाजपाने ट्विट करत म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ आरोपावरून भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

“बिहारमध्ये शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळं आहे का?”

अखिलेश यादव यांची भेट घेणारे 7 आमदार बसपामधून निलंबित

“उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते”

‘जान कुमार सानू तुला गर्व असायला हवा….’; जान कुमार सानूच्या समर्थनात धावली ‘ही’ अभिनेत्री

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या