नवी दिल्ली | इलेक्ट्रिक क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस प्रगती होत आहे. अशातच अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन उत्पादक टेस्ला कंपनीने शुक्रवार 12 फेब्रुवारी रोजी एक जबरदस्त मॉडेल लाँच केलं आहे. या कारची अनेकांना खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. या कारमध्ये खुप अॅडव्हान्स फीचर्स देण्यात आले आहेत.
टेस्ला कंपनीने दक्षिण कोरियामध्ये आपल्या मोटार विक्रीला चालना देण्यासाठी कॉम्पेक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल एसयूव्ही मॉडेल ‘वाय’ लाँच केलं आहे. या कारचे मॉडेल तीन किमंतींमध्ये उपलब्ध केले जाणार आहे. स्टॅंडर्ड रेंज मॉडेलची किंमत जवळपास 39 लाख रुपये असणार आहे. तर लाँग रेंज मॉडेलची आणि परफॉर्मन्स मॉडेलची किंमत अनुक्रमे 69 लाख रुपये आणि 79 लाख रुपये असणार आहे.
टेस्लाने लाँच केलेल्या ‘वाय’ मॉडेलचे लुक इतर मॉडेलच्या तुलनेत हटके आहे. या कारमध्ये पाच जण आरामशीर प्रवास करु शकतात. 2021 पासून दक्षिण कोरियात 60 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या इलेक्ट्रिक कारसाठी सरकार शासकीय अनुदान देणार आहे. म्हणजेच जे ग्राहक केवळ वाय कारचे स्टॅंडर्ड मॉडेल खरेदी करणार, त्यांनाच अनुदान मिळणार आहे. तसंच यूएस ईव्ही बँडने मॉडेल 3 सेदानचा प्रकारही बाजारात आणला आहे.
दरम्यान, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मास्क यांनी अखेर टेस्लाची कंपनी म्हणून बंगळुरु येथे नोंदणी करुन घेतली आहे. टेस्ला इंडिया मोटर्स अॅंड एनर्जी प्रायवेट लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर कंपनीटा पत्ता देखील बंगळुरु येथील आहे, त्यामुळे आता भारतीयांनाही टेस्लाच्या गाड्या भारतात कधी लाँच होतात याची ओढ लागली आहे.
थोडक्यात बातम्या-
आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….
‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!
सेक्स करताना संमतीशिवाय कंडोम काढणं आता बेकायदेशीर; होणार शिक्षा!
तो आला, पत्नीला प्रियकरासह पाहिलं, अन् त्यानंतर रंगला खुनी खेळ!
राजकारणातील बादशहाला भेटायला बॉलिवूडचा शहेनशहा बारामतीत?