बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जगप्रसिद्ध TESLA भारतात कार विकायला सज्ज, पहिल्यांदा ‘या’ तीन शहरांमध्ये गाड्या मिळणार

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनंतर आता सामान्य लोकांचा कल देखील इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहे. जगातली सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला लवकरच भारतात पदार्पण करत आहे. टेस्ला लवकरच भारतात इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. या कारचं नाव टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड असं ठेवण्यात आलं आहे.

टेस्लाची ही इलेक्ट्रिक गाडी भारताच्या तीन प्रमुख शहरात उपलब्ध होणार आहे. दिल्लीमध्ये शोरूम उघडण्यासाठी कंपनी जागेच्या शोधत आहे. तर यानंतर भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देखील गाडी विकली जाणार आहे. तर बंगळुरूमध्ये देखील शोरूम उघडण्यात येणार आहे. कर्नाटकने इलेक्ट्रिक गाड्यासाठी स्वतंत्र धोरण देखील निश्चित केल आहे. त्यामुळे दक्षिण भारतात इलेक्ट्रिक गाड्यांना मोठा वाव मिळू शकतो.

टेस्ला कारची आयात ही चीन मधून करण्यात येण्याची शक्यता आहे. काही शहरांमध्ये ही गाडी ऑनलाईनच मिळू शकेल. डिलरशिपच्या माध्यमातून या कारची विक्री होणार आहे. या कारमध्ये 500 किलोमीटर पर्यंतची रेंज आणि 162 किमी प्रति तास एवढी टॉप स्पीड असेल. मात्र याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.

दरम्यान, टेस्ला कंपनीचे मालक इलाॅन मास्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मास्क यांनी भारतात टेस्ला इंडिया मोटर्स ही उपकंपनी स्थापन केली आहे.

थोडक्यात बातम्या-

अखेर पुण्यावर केंद्राची कृपादृष्टी, कोरोना लसीचे 3 लाख 73 हजार डोस मिळणार

राज्यभरातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; सरकारकडून ‘या’ नियमात बदल

भिडे गुरुजींनी सरसंघचालक मोहन भागवतांना अपशब्द वापरले का?; संजय राऊतांच्या फॅनपेजवरुन सवाल

“…त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत ‘गांडू’च म्हणावं लागेल”

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More