बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय संघाच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाचा कसोटी, वन-डे मधुन निवृत्तीचा विचार?

नवी दिल्ली | भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यापुढे कसोटी आणि वन-डे सामन्यात खेळण्यास उत्सुक नसल्याची माहिती पुढे आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो फक्त टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यास इच्छुक दिसतो. भुवनेश्वरला विश्व कसोटी चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. त्याला वगळल्यामुळे अनेक आजीमाजी खेळाडूंनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

भुवनेश्वर कुमारच्या निकटवर्तीय सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, भुवीला वन-डे क्रिकेटमध्येही रस नाही आणि त्याला फक्त टी-20 खेळायचे आहे. तो टी-20 क्रिकेटमध्ये पुढील संधीची तयारी करत आहे. त्याला यापुढे कसोटी क्रिकेट खेळायचे नाही. आता त्याची लय गेली आहे. खरे सांगायचे झाले, तर भुवी एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास इच्छुक असेल, असे निवड समितीलासुद्धा वाटत नाही.

भारतीय संघाचे हे मोठे नुकसान आहे, इंग्लंड दौऱ्यासाठी कोणत्या खेळाडूला संघात असायला हवे होते, तर तो भुवनेश्वर कुमार होता, असे सूत्रांनी सांगितले. भुवीने जानेवारी 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तेव्हापासून दुखापतीमुळे तो संघात आत-बाहेर होत राहिला बरेचदा दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो आयपीएल किंवा भारताकडून सातत्याने खेळू शकला नाही.

यामुळेच, भुवनेश्वरने कसोटी आणि वन-डे क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला असावा. भुवनेश्वरने 2013 मध्ये भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यानंतर आतापर्यंत त्याने केवळ 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात 63 बळी घेतले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

महाविकास आघाडीतील मंत्रीच सरकारवर संतप्त, दिला आंदोलनाचा इशारा!

कोरोनामुळे घरातील व्यक्तीचा मृत्यू, समाजकंटकांनी शेतातील कांदा केला नष्ट

“2022 मध्ये मोदी राष्ट्रपती बनतील, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावून ते स्वत: सरकार चालवतील”

अरबी समुद्रातील वादळाचं रौद्ररुप, पुण्यावर काय परिणाम होणार?

काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव काळाच्या पडद्याआड; कोरोनाशी झुंज अपयशी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More