बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चेपॅाकवर मुंबईच्या गोलंदाजांसमोर कोलकाताच्या फलंदाजांची परीक्षा

चेन्नई | आयपीएलचा पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून या हंगामात आपलं खातं उघडलं आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात राॅयल चँलेजर्स बंगळुरूकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आता हे दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांसमोर कोलकाताच्या फलंदाजांची परीक्षा होणार आहे.

मागील 9 वर्षांची परंपरा जपत मुंबईने पहिला सामना गमावला. पण नंतर दमदार पुनरागमन करण्याची कला देखील मुंबईच्या संघात आहे. मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा मागील हंगामात दोन्ही सामन्यात पराभव केला होता. त्यामुळे आजच्या या सामन्यात मुंबईचं पारडं जड आहे. तर मागील वर्षाचा वचपा काढण्यासाठी कोलकाताचा संघ तयार असेल.

मुंबईच्या संघात सलामीचा फलंदाज क्विटंन डिकॅाक याचं आगमन होणार आहे. त्याचा विलगीकरणाचा काळ पुर्ण झाला असल्यानं तो आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. ख्रिस लीन आणि क्विटंन डिकॅाक यांच्यापैकी एकाला संघात स्थान देण्याचा निर्णय कर्णधार रोहित शर्मा याला घ्यावा लागेल. तर हार्दिक पांड्याच्या खांद्याला दुखापत झाल्यानं तो काही सामने गोलंदाजी करू शकणार नाही मात्र तो मैदानात फलंदाजी करू शकेल.

तर दुसरीकडे आपला पहिला सामना जिंकल्यानं कोलकाताचा संघ फाॅममध्ये आला आहे. नितिश राणा याला पहिल्याच सामन्यात सुर गवसल्यानं कोलकाताची मोठी चिंता दूर झाली आहे. तर दुसरीकडे आँद्रे रसल याने मागील सामन्यात कसदार गोलंदाजी केली होती. तर युवा फलंदाज शुभमन गिल देखील आपल्या खेळीने सर्वांनाच प्रभावित करत आहे. चेपाॅकच्या मैदानावर दोन्ही संघाच्या गोलंदाजांचा कस लागणार असल्यानं हा सामना मजेशीर होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

बंगाल निवडणूकीला नवं वळण; ममतांवर निवडणूक आयोगाची कारवाई

आता RT-PCR चाचणीत सापडेना कोरोना विषाणू; नव्या कोरोना स्ट्रेननं डाॅक्टराची वाढवली चिंता

महाराष्ट्रात लॉकडाऊन अटळ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

ऑक्सिजन न मिळाल्याने एका तासात 10 रूग्णांचा मृत्यु; ‘या’ शहरातील धक्कादायक घटना

अर्धशतक केलं दीपक हुडाने पण ट्रोल होतोय कृणाल पांड्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More