बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

कानपूर | नुकत्याच झालेल्या टी-ट्वेंटी मालिकेत भारताने पाहुण्या संघाचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला आहे. अशातच आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका खेळली (Test series between India and New Zealand) जात आहे. आजपासून या कसोटी सामन्यांना सुरूवात होत आहे. भारत या सामन्यात आपल्या प्रमुख 6 खेळाडूंशिवाय उतरेल. त्यामुळे आता भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्या गैरहाजरीत आता भारतीय संघाची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) असणार आहे. या सामन्यात युवा भारतीय खेळाडूंची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. अशातच भारताला 5 किवी खेळाडू धोकादायक ठरू शकतात.

केन विल्यमसन हा जगातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांच्या धुव्वा उडण्याची त्याची क्षमता आहे. त्याचबरोबर किवींचा सर्वांत अनुभवी फलंदाज राॅस टेलर भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तर मागील काही दिवसांपासून फाॅर्म मध्ये असणारा टाॅम लिथम कसोटी सामन्यात मोठी खेळी करू शकतो.

दरम्यान, न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेल यहा भारतीय खेळपट्टीवर आपल्या फिरकीची जादू दाखवू शकतो. त्याचबरोबर मिचेल सँटनर देखील राॅईट हॅड बॅटरला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार भारताने 23 धावा करत 1 गडी गमावला आहे.

थोडक्यात बातम्या-

बिग बॉसच्या घरात कोरोनाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

गृहिणींचं बजेट मोडलं! ‘या’ भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा आजचे ताजे दर

RBIनं ‘या’ बॅंकेवर घातली बंदी, खात्यातून फक्त 10 हजार काढण्याची मुभा

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यासह तब्बल 12 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More