बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

TET घोटाळा: राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या अटकेनंतर आणखी दोन जणांना अटक

पुणे | टीईटी परिक्षेत (TET Exam) म्हणजेच शिक्षक पात्रता परिक्षेत पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे.

टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतर तुकाराम सुपे यांनी अटक करण्यात आलं. याशिवाय दोन जणांना अटक करण्यात आला असून यापैकी एक शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर लागला आहे. आज त्यांना कोर्टात हजर करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणी आणखी कोण अधिकारी समाविष्ट आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“आघाडीच्या तिन्ही पक्षांचे नेते घाबरले, कार्यकर्ते बिथरले आहेत आणि….”

IRCTCची नवी सेवा, रेल्वे तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार परतावा

मोठी बातमी! पेपरफुटी प्रकरणात राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ‘या’ आठ जणांना मिळणार तिकीट

‘अविवाहित लोकांच्या हातात देश आहे आणि ते…’; नवाब मलिकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More