मशिदीतून ध्वनीप्रदूषण, वादानंतर चित्र हटवण्याचं आश्वासन

नवी दिल्ली | मशिदीतून ध्वनीप्रदूषण होतं, अशा अर्थाचं चित्र आयसीएसई बोर्डाच्या शाळांमधील विज्ञानाच्या पुस्तकात दाखवण्यात आलं होतं.

नेटिझन्सनी आक्षेप घेतल्यानंतर हे चित्र हटवण्याचं आश्वासन प्रकाशकांतर्फे देण्यात आलंय.

सेलिना पब्लिशर्सतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. यामध्ये विमान, रेल्वे आणि वाहनांसोबतच मशिदीतून निघणाऱ्या आवाजामुळे माणसाला त्रास होत असल्याचं दाखवण्यात आलं होतं.

दरम्यान, झालेल्या चुकीबद्दल प्रकाशकांनी माफी देखील मागितली आहे. 

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या