नाशिक | सध्या प्रेम व्यक्त करायचा आठवडा सुरु आहे. ‘प्रपोझ डे’च्या दिवशी नाशिकमधील इंदिरानगरमध्ये तरुणीने लग्नाला नकार दिल्यामुळं तरुणाने गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी 8 फेब्रुवारी रोजी उच्चशिक्षित अजय अनिल थोरात या 25 वर्षीय तरुणाने त्याच्या मैत्रीणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र तरुणीने त्याला नकार दिल्यामुळं नैराश्यातुन अनिलनं घरातील पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. त्याचा अंत्यविधी मूळ गाव अहमदनगरच्या पाथर्डी येथे पार पडला. या घटनेबाबत इंदिरानगर परिसरातील पोलिसांनी नोंद घेतली आहे.
अजयने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण पूर्ण केले होते. तो नाशिकच्या आरओ उपकरण विक्री करणाऱ्या कंपनीत काम करत होता. मागील चार महिन्यांपासून अजय राजसारथी सोसायटीमध्ये त्याचा मित्र करणसोबत भाड्यानं फ्लॅटवर राहत होता. ‘प्रपोझ डे’च्या दिवशी करण बाहेर गेला असताना अजयने रुमचे दार लॉक करुन गळफास घेतला. करण घरी पोहचल्यावर अजयला अनेकदा आवाज देऊन सुद्धा तो दार उघडत नसल्यानं त्यानं शेजारच्यांना बोलावलं. ही सगळी माहिती करणने पोलिसांना दिली. मिळालेल्या माहितीनूसार हा सगळा प्रकार सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आला.
दरम्यान, अजयच्या मागे आई, वडिल, दोन बहिण, दोन भाऊ आणि दाजी असा त्याचा परिवार आहे. त्याचे कुटुंबीय सध्या पुण्यात स्थायिक आहेत. अजयने उचलेल्या धक्कादायक पावलामुळं त्याचे कुटुंब कोलमडून गेलं आहे. तसंच या प्रकरणासंदर्भातील पुढील तपास इंदिरानगर पोलिस स्टेशनमधील उपनिरीक्षक हादगे करत आहेत.
थोडक्यात बातम्या-
“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”
अवैधरित्या दारु विकण्यासाठी घेतला देवाचा आधार; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हैराण
धक्कादायक! हॅार्न वाजवल्याचा राग आल्याने चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली
कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पवार कधी कुस्ती खेळलेत का?; सदाभाऊ खोतांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर
मोहम्मद सिराजने धरला कुलदीपचा गळा, व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ; पाहा व्हिडीओ
Comments are closed.