बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरे आणि संभाजी भिडेंची बैठक, बंद दाराआड झाली चर्चा

सांगली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर होते. उद्धव ठाकरेंनी सांगलीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची भेट घेतली. ठाकरे आणि भिडेंची ही बैठक 15 ते 20 मिनिटे चालली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी संभाजी भिडे भूसंपादन कार्यालयात तब्बल एक तास वाट पाहत होेेते. ही बैठक बंद दाराआड झाली. यामुळे भिडे आणि ठाकरे यांच्यात नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. माध्यमांनी भिडे यांना या बैठकीबाबत विचारले असता भिडेंनी त्यावर मौन बाळगलं आहे.

दरम्यान, सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. सांगली जिल्ह्यातील पावासाच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झालेल्या भिलवडी या गावाला आज मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच एक छोटी सभा देखील घेतली.

संकटं आली की आपल्याकडे पॅकेज जाहीर केली जातात, ही आपली प्रथा आणि परंपरा आहे. संकट आलं की पॅकेजची घोषणा होते, मग हे पॅकेज जातं तरी कुठं, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच मला अशी थोतांड येत नाहीत. मला खोटं बोलता येत नाही. जे करायचं ते प्रामाणिकपणे केलं जाईल आणि ते केल्याशिवाय राहणार नाही, असं देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘सिंधूला थार भेट द्यावी’, युजरच्या मागणीवर आनंद महिंद्रा म्हणाले, ‘तिच्या गॅरेजमध्ये…’

…त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धमक्यांना घाबरत नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

मुंबई कोरोनामुक्त होतंय! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; वाचा आकडेवारी

मेट्रोच्या ट्रायल रनवरून चंद्रकांत पाटील भडकले; अजित पवारांवर निशाणा साधत म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More