बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर; वाचा काय सुरू, काय बंद?

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात आजही 15 हजारांच्या घरात कोरोना रुग्ण सापडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ही नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लग्न सोहळ्यात फक्त 50 लोकांना परवानगी असेल. ही नवी नियमावली 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे.

सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. सर्व सिनेमागृह, हाॅटेल, रेस्टाॅरंट यांना 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील, त्यासाठी राज्य सरकारने मुभा दिली आहे. पण त्यांना कोरोनाची प्रतिबंधात्मक नियम पाळावे लागणार आहेत. मास्क नसल्यास ग्राहकांना हाॅटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच यंत्राने तपासणी केली असता तापमान प्रमाणापेक्षा जास्त आढळल्यास त्यालाही प्रवेश मिळणार नाही.

1. सर्व सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट हे 50 टक्क्यांच्या क्षमतेनं खुली असतील.

2. मास्क घातलेले नसल्यास सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट प्रवेश मिळणार नाही.

3. तापमान यंत्रणानं तपासणी केल्यानंतर कोणाला ताप असलेलं आढळल्यास त्यांना प्रवेश देण्यात येणार नाही.

4. प्रत्येक ठिकाणी हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे.

5. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम.

6. जर एखाद्यानं या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांकडून दंडही वसूल केला जाणार.

7. तसेच लग्न समारंभात 50 लोकांनाही परवानगी असेल. तसेच या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येणार.

8. अंत्यविधीसाठी 20 जणांनाच परवानगी असेल. तसेच तिथल्या स्थानिक प्रशासनानं याची खातरजमा करावी, जास्त लोक आढळल्यास कारवाई होणार.

9. होम क्वारंटाईन व्यक्तींवर शासनाचा कोरोना स्टॅम्प असणं आवश्यक.

दरम्यान, मागील 24 तासात महाराष्ट्रात एकूण 15 हजार 51 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय 10 हजार 671 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत, तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या –

‘ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करा’; भाजप नेत्यानं ममता बॅनर्जींवर केले धक्कादायक आरोप

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी; आरोग्यमंत्री कडक निर्बंध लागू करण्याच्या तयारीत!

“भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना श्रीरामाप्रमाणे देव मानून त्यांची पूजा केली जाईल”

रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ; अंमली पदार्थ विरोधी पथकाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More