मुंबई | ‘ठाकरे’ चित्रपटाला लोकांची चांगलीच पसंती मिळत असून चित्रपटाने 2 दिवसांत जोरदार कमाई केली असून 8.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.
प्रदर्शनापूर्वीच उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या ठाकरे चित्रपटाने पहिल्याच दिवशी 6 कोटींची कमाई केली आहे. संपूर्ण भारतात 1300 स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत पानसेंनी केलं असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने साकारली आहे.
दरम्यान, ठाकरे चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित झाला असून चित्रपट बनवण्यासाठी 20 कोटींचा खर्च आल्याचं बोललं जातय.
महत्वाच्या बातम्या-
-दादा तुमचाही कार्यक्रम होणार, थोडा वेळ थांबा; राम शिंदेंचा अजित पवारांवर पलटवार
–“आमचा 1 आमदार भाजपकडे गेला, तर त्यांचे 10 आमदार आमच्याकडे येतील”
-संभाजी पाटील निलंगेकरांसह अन्य 29 जणांची निर्दोष मुक्तता
-एखाद्या तरी सन्यासी व्यक्तीला ‘भारतरत्न’ द्या- बाबा रामदेव
-“काँग्रेसकडं चेहरा नाही, त्यामुळेच ‘चाॅकलेट’ चेहरे पुढं केले जात आहेत”