Top News महाराष्ट्र मुंबई

कोरोनाचा शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर मोठा परिणाम; ठाकरे सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई |   एकीकडे कोरोनाचं संकट गडद होत असताना दुसरीकडे राज्याची अर्थव्यवस्था देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. साहजिकच कोरोनाचा परिणाम शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर परिणाम झाला आहे.

राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तूर्तास शक्य नाही, असा महत्तपूर्ण निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तसंच ज्या शेतकऱ्यांची खाती निरंक झाली नाहीत त्यांना नवीन पीक कर्ज मिळणार नाही, असंही शासनाने जाहीर केलं आहे. एबीपी माझाने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शेतकरी वर्ग अभूतपूर्व संकटात सापडला आहे. तसंच लॉकडाऊनमुळे सरकारचा महसूल देखील दोन महिने पूर्णपणे थांबला होता.याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. याचमुळे सरकारी तिजोरीत देखील खडखडाट जाणवू लागला आहे.

दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा फटका हजारो शेतकऱ्यांना बसणार आहे. या निर्णयाने सरकारचे काही हजार कोटी रूपये वाचणार आहे. हेच पैसे सध्या कोरोनाच्या उपाययोजनांवर खर्च करण्यास उपयोगी येणार आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज कोरोनाचे 2940 नवीन रुग्ण; पाहा तुमच्या भागात किती?

…तर महाराष्ट्रानं भाजपची पाठ थोपटली असती; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत संतापले

महत्वाच्या बातम्या-

आजारी वडिलांना घेऊन 7 दिवसांत 1200 किमी सायकल प्रवास; ज्योती कुमारचं इवांका ट्रम्पकडून कौतुक

‘भाजपच्या रणांगणातून’ ही प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती गायब, राज्यभर चर्चांना उधाण

कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोनमध्ये कडक बंधने पाळली गेली पाहिजेत; अजितदादांच्या प्रशासनाला सूचना

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या