मुंबई | राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि 8 सदस्यांची नियुक्ती ठाकरे सरकारने रद्द केल्याची माहिती आहे. ठाकरे सरकार कृषीमूल्य आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती रद्द करणार नाही, असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. मात्र तसं झालं नाही.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर राज्य कृषी आयोगावर नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाशा पटेल यांची नियुक्ती रद्द करत ठाकरे सरकारने भाजपला आणखी एक दणका दिला आहे.
सरकार बदलल्यानंतर सत्ताधारी जेव्ही विरोधात जातात तेव्हा सरकारने नियुक्त केलेल्या अध्यक्षांना आणि संचालकांना पद सोडावं लागतं. मात्र काही जण पद सोडण्यास तयार होत नाही. त्यामुळे सत्तेत असलेलं सरकार त्यांच्या नियुक्त्या रद्द करतं.
दरम्यान, पाशा पटेलांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याने आता राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्याने माझ्याविरोधात षडयंत्र- हर्षवर्धन जाधव
“महात्मा गांधींचा चित्रपट टीव्हीवर लागला की बायको कपाळाला हात लावते”
महत्वाच्या बातम्या-
निर्भयाच्या आरोपींना उद्या फाशी नाहीच
रश्मी वहिनींकडून अशा टीकेची अपेक्षा नाही- चंद्रकांत पाटील
…तो पेन ड्राईव्ह ठरणार इंदोरीकरांसाठी डेंजर; अडचणी वाढणार?
Comments are closed.