बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

औरंगाबाद | विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास देण्यात येईल. अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेलं कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केलं आहे. त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“आपल्या मुली विश्वचषकाच्या फायनलपर्यंत गेल्या याचा आपल्याला आनंद आणि अभिमान पाहिजेच”

पुण्यातील कात्रजच्या घाटात भडकलेला वणवा सयाजी शिंदेंनी विझवला

महत्वाच्या बातम्या-

होळीत कोणतंही झाड जाळू नका, मनातून अंधश्रद्धा दूर करा- सयाजी शिंदे

“चांदमियां पाटील छातीत खरंच राम आहे ना?, मग बडवता कशाला”

झेंडा बदलल्यानंतर आज मनसेचा पहिला वर्धापनदिन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More