Top News औरंगाबाद महाराष्ट्र

एकमेकांच्या पायात पाय घालणारे सरकार लवकरच पडेल- रावसाहेब दानवे

Loading...

नांदेड | आम्ही सरकार पाडणार नाही.पण  हे तीन पक्षच एकमेकांच्या पायात पाय घालत आहेत. त्यामुळे हे सरकार कधी कोसळेल याचा नेम नाही, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकारने केलेल्या कामांना स्थगिती देण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. हे महाविकास आघाडी नव्हे तर स्थगिती सरकार आहे, असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकावर टीकास्त्र सोडले.

अमर, अकबर, अँथोनी या तीनजणांनी एकत्र येऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनविले. भाजपशी विश्वासघात करून शिवसेनेने सरकारमध्ये स्थान मिळविले आहे, अशी टीका त्यांनी केली.

आज मुख्यमंत्र्यांची अवस्था रबराच्या बाहुलीसारखी झाली आहे. मित्र पक्षाच्या इशाऱ्यावर या रबरी बाहुलीचा कारभार सुरू आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

देशाला गुजरातचे दंगल मॉडेल नकोय- जयंत पाटील

दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचारावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले…

महत्वाच्या बातम्या-

दिल्लीच्या हिंसाचाराला काँग्रेसच जबाबदार; रामदास आठवलेंचा गंभीर आरोप

“कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय”

“शिवसेना-भाजपने एकत्र यावं, आपण मिळून सरकार स्थापन करु”

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या