बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आगामी महापालिका निवडणुकांबाबत ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

मुंबई | आगामी काळातील नियोजित महापालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. राज्यात पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित आहे. महापालिका निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. मात्र ठाकरे सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ओबीसी आरक्षणाच्या पेचाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. या बैठकीला सर्व पक्षीय नेते उपस्थित होते.

जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, बैठकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत झाले होते. राजकीय आरक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

‘हा योगायोग नाही’; राणा जगजितसिंह पाटलांचं मुख्यमंत्र्यांना दुसरं पत्र

काबुल स्फोटाचा अमेरिकेकडून बदला; अफगाणिस्तानातील ISIS च्या अड्ड्यावर एअर स्ट्राईक

‘भारताचं इकॉनॉमिक मॉडेल म्हणजे जॉबलेस ग्रोथ, ‘या’ जिवलग मित्राची मोदींवर टीका

‘डॉक्टर्स अन् नर्सेसला घर बांधण्यासाठी फुकट जागा देणार’; सरकारचा मोठा निर्णय

हीच ती वेळ, दिरंगाई झाल्यास दशकभरात मुंबईत राहणं मुश्किल होईल- आदित्य ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More