बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! दिवाळीनंतर ठाकरे सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. आता कुठे कोरोना आटोक्यात येत असल्याचं दिसतंय. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत गेल्या आठवड्यात घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळं पूर्वपदावर येत आहे. अशातच आता दिवाळी तोंडावर आल्याने लोकांची मोठी गर्दी जमेल. त्यामुळे याबाबत ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोरोना उपाय सांगणाऱ्या टास्कफोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 ऑक्टोबर रोजी मोठी बैठक घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. 17 ऑक्टोबरला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात कोरोना निर्बंध शिथिल होण्याचे संकेत दिले होते. दसऱ्यानंतर आता दिवाळी जवळ आल्याने लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.

पुढील काही दिवसांनंतर शहरातील हॉटेल्स, माॅल्स, दुकानं रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच मुंबई लोकलबाबतही मोठा निर्णय अपेक्षित आहे. कोरोनाचे दोन नाही तर एक डोस घेतलेल्यांना देखील प्रवास करण्याची परवानगी मिळेल.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसत असल्याने नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे देखील सुरु करण्यात येत आहेत. तर मुंबईमध्ये 17 ऑक्टोबर रोजी एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.

थोडक्यात बातम्या-

“कोण नरेंद्र मोदी? बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झालेत नाहीतर…”

“शेतकऱ्यांना टोपी घालण्यात नरेंद्र मोदी आणि शरद पवार सारखेच”

कोरोनातून बरं करण्यासाठी स्टेरॉईडस् दिलेल्या रुग्णांसाठी महत्वाची बातमी समोर!

“वाजत गाजत शपथ घेतलीये, लोक झोपेत असताना लपून छपून, कड्याकुलुपात शपथ घेतली नाही”

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; आता लसीचा एक डोस घेतलेल्यांनाही मिळणार…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More