बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शासनाचा सावळा गोंधळ! दिवाळी सुट्ट्यांची तारीख अचानक बदलली

मुंबई | ठाकरे सरकारच्या निर्णायातील गोंधळ पुन्हा एकदा राज्यासमोर आला आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्ट्यांचा निर्णय शासनानं अचानक बदलला आहे. परिणामी सर्व अधिकारी आणि व्यवस्थापक गोंधळात सापडले आहेत. आधी शाळांना 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान सुट्ट्या असतील असं परिपत्रक संचालक शालेय शिक्षण विभाग पुणे यांनी काढले होते. मात्र या निर्णयात आता बदल करण्यात आले आहेत.

राज्यातील शाळांच्या सुट्ट्यांमध्ये शासनानं बदल केले आहेत. आता राज्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान असणार आहेत. परिणामी सर्व शाळांना आपापल्या प्रथम सत्र परिक्षांचं नियोजन बदलण्याची वेळ आली आहे. पुर्वीच्या सुट्ट्या गृहीत धरून अनेक शाळांनी आपापले वेळापत्रक बनवलं होतं पण अचानक शासनानं हा निर्णय घेतल्यानं शाळा व्यवस्थापन अडचणीत सापडलं आहे.

राज्यातील काही शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावी वर्गाच्या प्रथम सत्राच्या परिक्षा सध्या चालू आहेत. तर काही शाळांनी या परिक्षा 30 ऑक्टोबरनंतर घेण्याचं ठरवलं होतं पण या निर्णयानं नियोजन बिघडलं आहे. राज्य सरकारच्याच विभागांमध्ये समन्वय नसल्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जात आहे. परिणामी आता सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी करताना शाळांना आपलं वेळापत्रक बदलावं लागणार आहे.

दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून राज्यातील सर्व शाळा बंद होत्या. काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू करण्यासंदर्भात कारवाई करण्यात आली होती. आता दिवाळीसारख्या सणामध्ये सुट्ट्या पण द्याव्या लागणार आहेत. एकंदरीतच विद्यार्थ्यांमध्ये पून्हा शाळा आणि शिक्षणाबाबत रूची निर्माण करण्यासाठी शिक्षक आणि सरकार दोन्हींना कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.

थोडक्यात बातम्या 

“अनिल देशमुख कुठं आहेत याचं उत्तर शरद पवारांनी द्यावं”

एमपीएससीची मोठी घोषणा! PSI, STI, ASO मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर

“त्या पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफिया होता, सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तर…”

“महाराष्ट्राबाहेरही शिवसेनेचा भगवा फडकवणारच”

दिवाळी सुट्ट्या जाहीर! राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More