बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आघाडी सरकारमधील नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावतील”

अमरावती | राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांवर भाजपकडून आरोप करण्यात येत आहेत. त्यातच आता महाविकास आघाडी सरकार पडणार काय?, अशी चर्चा राज्यात सुरू आहे. आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकार  पडणार, असा दावा केला आहे.

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. राज्यात राष्ट्रपती शासन लागेल अशी परिस्थिती आहे. तसेच महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावं लागेल, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. जे जे मंत्री घोटाळेबाज आहेत त्यांना तुरूंगात टाकाव लागेल, असंही रवी राणा म्हणाले आहेत.

हे तीन तिघाडी सरकार आहे. तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामध्ये कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. सरकारमधील जे काही नेते गजाआड जातील आणि जे गजाआड जाण्याच्या तयारीत आहेत. त्यावरूनच वाटतं की, हे नेते स्वत:च सरकार बरखास्त करून राज्यात राष्ट्रपती राजवट लावतील, अशी शक्यता आहे, असंल्याचं रवी राणांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकार कोसळेल, असा दावा करण्यात येत आहे. अशातच रवी राणा यांनी बोलताना राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाई संदर्भात वक्तव्य केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनिल परब हे सुद्धा तुरूंगात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यांची चौकशी आणि फाईल पुर्ण झाली आहे. अनिल परब हे गजाआड दिसतील, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

Russia-Ukraine War | केंद्र सरकारकडून भारतीयांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

“बाळासाहेब म्हणायचे दाऊद आणि शरद पवारांची जोडी महाराष्ट्राची वाट लावणार”

रशियाकडून युक्रेनच्या दहा शहरांवर बॉम्ब हल्ला, ‘इतक्या’ नागरिकांचा मृत्यू 

Russia-Ukraine War | “युद्धजन्य परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यस्थी करावी”

Russia-Ukraine War | युक्रेनसोबत रशियाचा नेमका वाद काय?, वाचा सविस्तर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More