बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी ठाकरे सरकार 5 वर्षे टिकणार”

मुंबई | राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून हे अधिवेशन चांगलंच वादळी ठरत असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या अनेक नेत्यांविषयी षडयंत्र रचत आहेत, साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत सारे कसे मॅनेज केले जाते आहे, याची संपूर्ण माहिती आणि पुरावे फडणवीसांकडे आहेत. यावरुन आता राजकीय वातावरण पेटलंलं दिसत आहे.

फडणवीसांच्या केलेल्या व्हिडीओ रेकाॅर्डिंग पेन ड्राईव्हच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असला तरी सरकार 5 वर्ष टिकणार असल्याचेही पवार यांनी म्हटले. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणे गरजेचं असून या सर्व व्हिडीओबाबात राज्य सरकार पडताळणी करत आहे, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, 125 तास रेकॉर्डिंग करायचं म्हणजे किती दिवस रेकॉर्डिंग चाललं म्हणजे यासाठी शक्तीशाली यंत्रणा वापरली असल्याची शक्यता आहे. अशा यंत्रणा भारत सरकारकडे आहेत’, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बाॅम्बवर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले….

विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार आणि गाराही पडणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मोठी बातमी! रशियाची ‘ही’ अट युक्रेनला मान्य

…तर योगी आदित्यनाथ इतिहास रचतील, अनेक विक्रम मोडतील

“म्हणजे आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More