“…तर महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार आणलं असतं”
मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात घटनापीठाने मोठा निकाल दिला आहे. निकालात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा दिला असला करी घटनापीठाने या प्रकरणातील अनेक बाबींवर ताशेरे ओढले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून बहुमत चाचणीचे निर्देश दिले होते. तेव्हाच्या सगळ्या घडामोडी पाहता उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पण उद्धव ठाकरे यांची तीच कृती चुकीची ठरल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे.
सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंचा राजीनामा परत घेऊ शकत नाही. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर कोर्टाने सरकार परत आणलं असतं, असं मोठं वक्तव्य सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सत्तेसाठी हापापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा हा निकाल असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
Comments are closed.