बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

मुंबई | शिक्षक पात्रता परीक्षेत म्हणजेच टीईटी परीक्षेत (TET Exam) पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) यांना अटक करण्यात आली होती. अशातच तुकाराम सुपे यांच्यावर आता ठाकरे सरकारने मोठी कारवाई केली आहे.

तुकाराम सुपे यांना अटकेच्या तारखेपासून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. त्याचबरोबर तुकाराम सुपे यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. चार दिवसापू्र्वी सुपे यांना  अटक करण्यात आली होती.

टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहारावरून सुपे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीईटी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या संशयावरुन तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, याप्रकरणी आणखी दोन जणांना अटक करण्यात आलं असल्याचं समोर आलं होती. पुणे पोलिसांना तुकाराम सुपेच्या घरात 2 कोटी रुपये आणि मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्याची माहिती समोर आली होती. अशातच आता या प्रकरणात पुणे पोलीस आणखी धागेदोरे शोधत आहेत.

थोडक्यात बातम्या-

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

‘हा’ बहुप्रतिक्षित IPO शेअर बाजारात धडकणार; गुंणतवणूकदांरांंना मोठी संधी

इकडं सुनेची ईडीकडून चौकशी तर संसदेत सासू भाजपवर कडाडल्या

कुत्री-माकडांचं टोळीयुद्ध संपलं! दहशत माजवणारी माकडं अखेर जेरबंद

“माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, मी ‘त्या’ नेत्यांसारखा नाही जे…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More