Top News महाराष्ट्र मुंबई

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांबाबत ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्याबाबतीत ठाकरे सराकरनं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान दरमहा 5 हजार रुपये देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर ज्या महिलांची मुलं शाळेत जातात, अशा महिलांना 25हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून सरकारतर्फे देण्यात येणार आहे. यायाठी नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून वेश्या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना अतिरिक्त कोणत्याही ओळखपत्राचा आग्रह न धरता अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील ३२ जिल्ह्यांना एकूण ५१ कोटी १८ लाख ९७ हजार ५०० रुपये इतका निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून उपलब्ध करुन देण्याबाबतचा निर्णय गुरूवारी जारी करण्यात आला. या आदेशानुसार महाराष्ट्रात तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विभागाला दिले. त्यानुसार काल त्याबाबतचा जीआर जारी करण्यात आला.

दरम्यान, वेश्या व्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना  मुलभूत सेवा पुरविण्याच्या अनुषंगाने जिल्हानिहाय प्रस्ताव पुढील कार्यवाहीकरिता, महिला व बाल विकास आयुक्त यांच्याकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

अकरावी, आयटीआय आणि इतर प्रवेश प्रक्रियांचा मार्ग आता झाला मोकळा!

‘तो’ निर्णय माझा व्यक्तिगत नव्हता, सरकारचा होता- नितीन राऊत

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा जागीच मृत्यू

“नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका आहे”

“आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस अन् गोड चहा घेणं सोडा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या