बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोटनिवडणुकांबाबत ठाकरे सरकारचा निर्णय पक्का; थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | सध्या मराठा आरक्षण, पदोन्नतीस आरक्षण आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे. त्यातच आता धुळे, नंदुरबारसह पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ओबीसी राखीव जागांसाठीची पोटनिवडणूक खुल्या प्रवर्गातून 19 जुलै होईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता ठाकरे सरकार निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. त्यासाठी त्यांनी पुढचं मोठं पाऊल उचललं आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 6 जिल्हा परिषदा आणि 44 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची मागणी करणारी रिट याचिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पोटनिवडणुकांवर चर्चा झाली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून कोविडचे कारण देत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्या मागणीला निवडणूक आयुक्तांनी नकार कळवला होता. त्यानंतर ठाकरे सरकारने पुढचं पाऊल उचललं आहे.

राज्यात कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, तसेच साथीचे आजार वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर 19 जुलै रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना 6 महिन्यांची स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. या प्रकरणात मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्य सरकारने अनेकवेळा मागणी करूनही केंद्र सरकारने एंपेरिकल डेटा दिला नाही. त्यामुळे हा डाटा देण्याचे न्यायालयानेच आदेश केंद्र सरकारला द्यावेत, या मागणीसाठी राज्य सरकार लवकरच सर्वोच्च न्यायालयात दुसरी याचिका करणार आहे, अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे मुंबईच्या समुद्रातील 200 दशलक्ष लिटर खारं पाणी होणार पिण्यायोग्य

प्रदीप शर्माची तळोजा कारागृहात रवानगी, 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

“तुमची घरं वसुलीवर चालतात, पण सामान्य जनतेला नोकरी, उद्योगधंदे करून घर चालवावं लागतं”

मराठमोळ्या राहीनं पटकावलं गोल्ड मेडल; देशाला पहिलं सुवर्णपदक

पुण्यात आजपासून संचारबंदी लागू; ‘या’ वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर होणार कारवाई 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More