बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदारांची दिवाळी गोड! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यातील आमदारांच्या विकास निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांच्या विकास निधीमध्ये 1 कोटी रूपयांनी वाढ केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वच आमदारांनी स्वागत केलं आहे.

सध्या राज्यातील आमदारांना मतदार संघातील विविध विकास कामांसाठी दरवर्षी 3 कोटी रूपयांचा विकास निधी शासनाकडून मंजूर होतात. पण आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळं आमदारांच्या विकास निधीमध्ये वाढ होत, तो आता 4 कोटी रूपयांवर पोहचला आहे. आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळं आमदारांना आता मतदारसंघातील विविध विकास कामं पूर्ण क्षमतेने करता येणार आहेत. हाच या निर्णयामागील सरकारचा हेतू असल्याचं सांगितलं जातंय.

आमदारांना आता वाढीव निधीमधून रस्ते, अंगणवाडी आणि शौचालय सारख्या कामांना निधी वापरता येणार आहे. तसेच फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य सरकारने आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये 1 कोटी रूपयांची वाढ करण्यात आली होती. ही वाढ करताना सरकारकडून बांधकाम आणि इतर साहित्यामध्ये झालेली वाढ यामुळं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2020-21 च्या अर्थसंकल्पात स्थानिक विकास निधीमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. आता त्यानंतर राज्य सरकारने केलेल्या घोषणेवर निर्णय घेतला आहे.

थोडक्यात बातम्या – 

मंदाकिनी खडसेंना तुर्तास तरी अटक नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

“दसरा मेळावा हा कोणत्याही जातीपातीचा तसेच कोणत्याही वर्गाचा नाही”

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

200 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी नोरा फतेहीला ईडीने बजावलं समन्स

SBI च्या ‘या’ भन्नाट योजनेत पैसे गुंतवा आणि मालामाल व्हा, वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More