बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढली, महाविकास आघाडीतील ‘या’ बड्या नेत्यानं पुन्हा दिला इशारा

कोल्हापूर | राज्यातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असूनही गेले काही दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारविरोधात भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमकपणे रस्त्यावरची लढाई सुरु केल्याने संघटनेच्या भूमिकेविषयी तर्क-वितर्क लावले जात आहेत. घटकपक्षांनी थेटपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्याने ठाकरे सरकारची डोकेदूखी वाढणार आहे.

केंद्रातील भाजप सरकारसोबत असतानाही राजू शेट्टी सतत त्यांच्या विरोधात मत मांडत होते. त्यांना सोडून महाविकास आघाडीत सहभागी झाल्यानंतर आता ते या आघाडी सरकारला धारेवर धरत आहेत. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पावर त्यांनी जोरदार टीका केली. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे म्हणून ते सरकारच्या विरोधात लढत आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांनी महाविकास आघाडी स्थापना केल्यानंतर राज्यातील काही अन्य पक्षही यामध्ये सहभागी झाले. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, शेकाप, लोकभारती व रिपाइं कवाडे गटाचा समावेश आहे. पहिल्या दिवसापासून हे घटकपक्ष आघाडी सरकारवर नाराज आहेत.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना तर उघडपणे आपली नाराजी व्यक्त करू लागली आहे. विधानसभेत या संघटनेचा एक आमदार आहे. राज्यपाल नियुक्त बारा सदस्य नियुक्तीच्या प्रस्तावात संघटनेचे राजू शेट्टी यांचे नाव आहे. पण ही नियुक्ती राज्यपालाकडून थांबली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गेले काही दिवस संघटनेने सरकारच्या विरोधात आंदोलनाची भाषा सुरू केली आहे.

थोडक्यात बातम्या –

ममता बॅनर्जींच्या पायाला गंभीर दुखापत; तर प्रशांत किशोर सोशल मीडियात ट्रेंडमध्ये

“सचिन वाझेंना वकिलाची गरज नाही, उद्धव ठाकरे हेच त्यांचे वकील”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नव्याने निर्बंध लावण्याचा विचार- मुरलीधर मोहोळ

दीड वर्षाच्या मुलाच्या पोटात आढळला मृत गर्भ, पुण्यातील ‘या’ रूग्णालयात पार पडली यशस्वी शस्त्रक्रिया!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला; पायाला झालीय गंभीर दुखापत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More