महाराष्ट्र मुंबई

‘ठाकरे सरकारचा सम्राट अशोक कालीन गुंफेचा बिल्डरांशी सौदा करण्याचा घाट”

मुंबई | ठाकरे सरकारने अंधेरी येथील सम्राट अशोक कालीन महाकाली गुंफा बिल्डराच्या घशात घालण्याचा घाट घातल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काल शनिवारी अंधेरी येथील सम्राट अशोक कालीन प्राचीन महाकाली गुंफेची पाहणी केली.

आम्ही काल महाकाली गुंफेची पाहणी केली. ही अति प्राचीन गुंफा आहे. सम्राट अशोकाच्या काळातील ही गुंफा आहे. मात्र ठाकरे सरकार शाहिद बलवा आणि अविनाश भोसले या दोन बिल्डरांशी या पवित्र जमिनीचा सौदा करायला निघाले आहेत. आम्ही हे कदापिही होऊ देणार नाही. ही जमीन बिल्डराच्या घशात जाऊ देणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

महाकाली गुंफा आणि रस्त्यांचा टीडीआर मिळावा म्हणून 26 नोव्हेंबरला ठाकरे सरकारने विशेष जीआर काढला. डिसेंबरमध्ये ऑर्डर सही केली आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. पण देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. तरी उद्धव ठाकरे सरकारने तो कसा पास केला. मुंबई महानगरपालिका आयुक्त खोटारडे आहेत. इक्बाल चहल यांची या प्रकरणात हकालपट्टी झाली पाहिजे, असं सोमय्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

“राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं पाहिजे”

काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही- संजय राऊत

पुण्यात धक्कादायक घटना!; काॅलसेंटरमधून घरी चाललेल्या तरुणीला रस्त्यात अडवून बलात्कार

शेतकऱ्यांशी बोलायला पंतप्रधानांना अपमान वाटतो- हसन मुश्रीफ

कोरोनाची लस कुण्या पक्षाची नाही, मी आनंदाने घेईन- ओमर अब्दुल्ला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या