बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ठाकरे सरकारने अंगणवाडी सेविकांना दिलं ‘हे’ भाऊबीजेचं खास गिफ्ट

मुंबई | सर्वत्र सध्या दिवाळीची तयारी चालू आहे. आपल्याकडे दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना विविध स्वरूपाच्या भेट देत असतं. अशातच आता राज्यातील आरोग्य व्यवस्थेत महत्वाचा वाटा उचलणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी सरकारनं मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्यातील बालकांना योग्यप्रकारे सांभाळण्याची आणि त्यांच्या सर्वांगिण विकासाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांची असते. एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रूपये मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी 37कोटी 97लाख निधी उपलब्ध केला आहे. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, अशी घोषणा ठाकूर यांनी केली आहे.

राज्यात सध्या गेल्या दीड वर्षापासून बंद असणाऱ्या अंगणवाड्या चालू झाल्या आहेत. यामध्ये कार्यरत अंगणवाडी सेविकांच्या अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं अनेक आंदोलन सुद्धा केली आहेत. अशातच आता राज्य सरकारतर्फे मदतीची घोषणा झाल्यानं अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचंही ठाकूर म्हणाल्या आहेत.

दरम्यान, सध्या राज्य सरकारच्या विविध विभागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि इतर सोई देण्यात येत आहेत. यातच आता अंगणवाडी सेविकांना मदत जाहीर झाल्यानं सर्वस्तरातून निर्णयाचं स्वागत होत आहे.

थोडक्यात बातम्या 

‘तुषार भोसले माफी मागा नाहीतर…’; ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्यावर राष्ट्रवादी आक्रमक

‘एक बाप म्हणून मी खूप…’; आर्यन खानच्या जामिनानंतर आर. माधवनचं ट्विट

अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे; दिवाळीआधी प्रवाशांना मोठा दिलासा

“मोहम्मद आमीरची इतकी औकात नाही की, मी त्याच्याबद्दल बोलावं”

“मला आता ‘बाबूराव गणपतराव आपटे’ पात्रातून सुटका हवी आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More