महाराष्ट्र मुंबई

“फुटकळ चर्चेसाठी सरकारकडे वेळ आहे, पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही”

मुंबई | या सरकारकडे फुटकळ चर्चा करण्यासाठी वेळ आहे. पण मराठा आरक्षणावर चर्चा करायला वेळ नाही, अशी घणाघाती टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत गोंधळ झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानसभेबाहेर मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी केली.

विधानपरिषदेचे सर्व कामकाज थांबवून मराठा आरक्षणावर चर्चा घडवून आणावी अशी आम्ही मागणी केली होती. तसा प्रस्तावही सरकारला दिला होता. पण या मुद्द्यावर सरकारने कालही चर्चा करू दिली नाही आणि आज तर एक शब्दही काढू दिला नाही, असं मेटेंनी सांगितलं.

येत्या 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी होणार आहे. त्याचं काय करणार आहे? सरकारने काय तयारी केलीय? याबाबतची कोणतीही माहिती द्यायला सरकार तयार नाही, असा आरोप मेटे यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला’; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

आईची शपथ घेऊन सांगतो; भर सभागृहात मुनगंटीवारांना का घ्यावी लागली शपथ???

‘चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी

“महाराष्ट्रात आणीबाणी लागू करून फडणवीसांना सत्तेत यायचंय”

कर्नाटक विधानपरिषदेत गोंधळ; उपसभापतींना खुर्चीवरून खेचलं खाली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या