Uddhav Thackeray controversy l शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षावर गंभीर आरोप करत “ठाकरे गटात दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळत असे” असे वक्तव्य केले होते. यानंतर शिंदे गटाच्या डॉ. ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी देखील ठाकरे गटावर जोरदार टीका करत, “नीलम गोऱ्हेंनी मातोश्रीची काळी बाजू उघड केल्यामुळे बीएमसीचे ‘टक्कापुरुष’ उद्धव ठाकरेंना धक्का बसला आहे” असा घणाघात केला.
ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीवर सवाल :
ज्योती वाघमारे यांनी “मर्सिडीज गाड्याच नाही तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची ‘बाबागाडी’ देखील बीएमसीच्या टक्क्यांमधूनच आली का?” असा थेट सवाल केला.
त्या पुढे म्हणाल्या, “मातोश्री-2 च्या उभारणीसाठी आणि रेशमी साड्यांसाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून खंडणी गोळा केली जात होती, असे जुने लोक सांगतात. महाराष्ट्रात उष्णता वाढली की गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी लंडनला जाता, त्या प्रॉपर्टी कशा झाल्या? आदित्य ठाकरेंकडे वयाच्या तिशीतच एवढी संपत्ती आली कुठून?”
Uddhav Thackeray controversy l राणेंच्या ‘लेना बँक’ आरोपावर टीका :
वाघमारे यांनी पुढे सांगितले की, “नारायण राणे (Narayan Rane) म्हणतात तुम्ही ‘लेना’ बँक आहात, तर राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणतात तुम्हाला ‘खोके’ नव्हे, तर ‘कंटेनर’ लागतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “ठाकरे कुटुंब ज्या परदेशी महागड्या गाड्या वापरतात, त्या नेमक्या कोणाच्या नावावर आहेत? आणि थिएटरच्या बाहेर सिनेमाच्या तिकिटांसाठी दलाली केली जाते तशी ठाकरे गटात पदांसाठी केली जाते, असा आरोप अनेकांनी केला आहे. यात कितपत सत्य आहे?”