महाराष्ट्र मुंबई

‘नया है वह’ म्हणणाऱ्या फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असा टोला लगावला होता. आता फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

कदाचित त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी अनुभवी नाही. पण, असं म्हटलं तर मी प्रौढ आहे. मला अनुभव नसल्याचा आनंदच आहे. कारण माझ्या अनुभव नसण्याचा अर्थच असा आहे की, मी लोकांचा वंश, धर्म, जाती, लिंग, पंथ वा राजकीय रंग न पाहता त्यांच्यासाठी काम करत आहे, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना उत्तर दिलंय.

आम्ही जे काही करतो त्यावर टीका करायला त्यांना आवडतं. पण तुम्ही केंद्र सरकारविरुद्ध बोललात, तर मग तुम्ही त्यांच्यासाठी देशद्रोही ठरता. त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणं हाच उत्तम मार्ग आहे. हे मानवतेसाठी चांगलं नाही, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय.

दरम्यान, दुर्दैवानं जग कुठल्या परिस्थितीतून जात आहे, याची जाणीव त्यांना नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा…..”

एअर इंडियाचा मोठा निर्णय; पाच वर्षांसाठी कर्मचाऱ्यांना पाठवणार विना पगारी सक्तीच्या रजेवर

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी ‘या’ तीन वेबसाईटवर पाहता येणार निकाल

‘ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राजू शेट्टींनी ताळतंत्र सोडलं ”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या