Top News

‘ठाकरे’ सिनेमात बाळासाहेबांचा खराखुरा आवाज घुमणार?

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा बहुप्रतिक्षित ‘ठाकरे’ या सिनेमात आता बाळासाहेब ठाकरे यांचा हुबेहुब आवाज काढणारे प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल हे आवाज देणार आहेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.   

काही दिवसांपूर्वी ‘ठाकरे’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. लोकांच्या पसंतीस ‘ट्रेलर’ उतरला होता पण बाळासाहेवांच्या आवाजावरून सोशल मीडियात लोकांनी नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे चित्रपटात सचिन खेडेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आवाज दिला होता.

चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांनी आवाजावरून झालेल्या टीकेची गंभीर दखल घेतल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान, प्रसिद्ध डबिंग आर्टिस्ट चेतन शशितल यांनी ‘ठाकरे’ या चित्रपटात बाळासाहेबांचा आवाज दिला तर बाळासाहेबांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब असू शकते.

महत्वाच्या बातम्या –

-“मोदींनी शेतकऱ्यांचा एक रुपयाही माफ केला नाही”

-“जेव्हा बँकेत घोटाळे होत होते, तेव्हा चौकीदार गाढ झोपेत होता”

-नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत- चंद्रशेखर आझाद

-“असंख्य नवऱ्यांना वाटतं शिवसेनेसारखी बायको पाहिजे, लफडी कळली तरी सोडत नाही”

-आम्ही शिवसेनेला पाठींबा द्यायला तयार होतो- देवेंद्र फडणवीस

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या