बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकार प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं होतं”

मुंबई | शिवसेना पक्षाचा 55 वा वर्धापन दिन पार पडला. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत शिवसैनिकांशी संवाद साधला. काल उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मोलाचं मार्गदर्शन करण्याबरोबरच चौफेर फटकेबाजी देखील केली होती. यावेळी त्यांनी दादरमध्ये झालेल्या राड्यावर देखील भाष्य करत अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला होता. उद्धव ठाकरेंच्या या भाषणावरुन आता भाजपने त्यांच्यावर टीका केलीआहे.

उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाचं भाषण हे एका सरकारच्या प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं भाषण होतं, अशी गंभार टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. मुनगंटीवार यांनी ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे.

यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, दोन दिवसांअगोदर आम्ही गुंड आहोत अशी भाषा करायची आणि आज काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा केल्यावर त्यांना जोड्याने मारण्याची भाषा करायची, हे आश्चर्यजनक आहे. या भाषणातून देशातील जनतेला हिंदुत्व म्हणजे काय? हे सांगण्याचा प्रयत्न होत होता. हिंदुत्वाबद्दल तुमची भुमिका काय हे यावेळी सांगणं अपेक्षित होतं.

मात्र, हे भाषण केवळ खुर्चीच्या आसपास भरकटत होतं. वर्धापन दिनानिमित्त खुर्चीच्या संदर्भातील उदात्तीकरण करणार भाषण आज बघितलं. मला वाटतं हे एका सरकारच्या प्रमुखाचं नसून एका गॅंग प्रमुखाचं भाषण होतं, असा घणाघात मुनगंटीवार यांनी ठाकरेंवर केला आहे. आता यावर ठाकरे काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

खुशखबर! आज चांदी 2 हजारांनी तर सोनं 600 रुपयांनी उतरलं; वाचा ताजे दर

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवडची तहान भागवणारं ‘हे’ धरण 33.26 टक्के भरलं

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More