नवाब मलिक प्रकरणी ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Agencies) कारवाईवरून राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांना ईडीकडून (ED) अटक करण्यात आली. परिणामी आता मलिक यांच्याबाबत ठाकरे सरकारनं (Thakeray Government) मोठा निर्णय घेतला आहे.
नवाब मलिक यांच्याकडं अल्पसंख्यांक मंत्री आणि कौशल्य, उद्योजकता, रोजगार या खात्यांचा कारभार होता. राष्ट्रवादीच्या प्रस्तावानंतर उद्धव ठाकरेंनी आता या खात्यांचा कारभार अन्य मंत्र्यांना सोपवला आहे. राजेश टोपे (Rajesh Tope) कौशल्य विकास खातं तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अल्पसंख्यांक खातं सांभाळणार आहेत.
नवाब मलिक यांच्याकडं असणाऱ्या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देखील काढून घेण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या मोठ्या विरोधानंतरही नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला गेला नाही. राज्यातील जनतेचं काम अडकू नये म्हणून इतर मंत्र्यांकडं कारभार सोपवण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
थोडक्यात बातम्या –
“आमदारांना घरे देण्याचा निर्णय झाला नाही”; ठाकरे सरकारचा यु-टर्न
“आंडू पांडूंनी माझा नाद करू नये”; भाजपचा ठाकरे सरकारला इशारा
“राजीनामा मागणारे विरोधक आणि…”; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर
पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी! 10वी नापास देखील करू शकतात अर्ज
डॉ. प्रमोद सावंत यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
Comments are closed.