मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यापूर्वीच ठाकरेंचा मोदींना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा उद्घाटन सोहळा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) हस्ते पार पडणार आहे. या निमित्त मोदी रविवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

मोदी रविवारी महाराष्ट्रात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी(Udhav Thackeray) मोदींना चांगलंच सुनावलं आहे. यावेळी ठाकरेंनी सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर पंतप्रधान म्हणून मोदींनी लक्ष घालावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मराठवाडा साहित्य संमेलनात बोलताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी उद्या जरूर यावं आणि आमचे कानही टोचवावेत तो त्यांचा अधिकार आहे. पण महाराष्ट्र-कर्नाटक प्रश्नावर आणि कर्नाटक मुख्यमंत्र्यांची जी अरेरावी सुरू आहे, त्यावर बोललंच पाहीजे. यावर पंतप्रधानांच्या भूमिकेची महाराष्ट्र वाट पाहतोय.

एका मोठ्या रस्त्याच्या उद्घाटनादरम्यान कर्नाटकनं महाराष्ट्राचे दरवाजे बंद केले असतील तर पंतप्रधान म्हणून काय बोलणार आणि महाराष्ट्राला काय दिसाला देणार, हे अगोदर सांगा आणि नंतरच शिवसेना प्रमुखांच्या नावाच्या महामार्गाचं उद्घाटन करा, असा थेट इशाराच ठाकरेंनी मोदींना दिला आहे.

सीमाप्रश्नासाठी शिवसेना प्रमुख तीन महिने तुरूंगात राहिले होते. शिवसेनेची स्पष्ट भूमिका होती की, बेळगाव, कारवार,निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे.असंही यावेळी ठाकरे म्हणाले.

बाळासाहेंबाची शिवसेना म्हणून तुमच्या ढेंगेखाली जाऊन आलेल्या लोकांनी याबाबत त्यांची काय भूमिका आहे, हेही आज स्पष्ट झालं पाहिजे, असं म्हणत त्यांनी शिदें गटावरही निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-