Top News

नव्या सरकारमधील मंत्र्याचं खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल- बाळासाहेब थोरात

मुंबई | मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमधील मंत्र्याचे खातेवाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होईल, असं काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या रूपात नविन सत्तासमिकरण अस्तित्वात आलं आहे. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ 28 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर घेतली. त्यानंतर सर्वांचं लक्ष या मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागले आहे. या तिघांच्या सत्तावाटपात कोणाला कोणतं मंत्रीपद मिळतं  हे पाहणं औस्तुक्याचं ठरेल.

सरकार अस्तित्वात येऊन आठवडा उलटला आहे. अजुनही ठाकरे सरकारचं खातेवाटप पुर्ण झालेलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीत खाते वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खातेवाटपाची चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असून याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर होईल, असं बाळासाहेब थोरात यांनी दिली.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडीच्या रूपात सत्तास्थापन केली. आघाडीत मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे तर उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आलं आहे. मात्र काँग्रेसकडून मंत्र्याची यादी निश्चित होत नसल्याने मंत्रीमंडळ तसेच खातेवाटप विस्तारास विलंब होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या