Thane Crime | माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पुतण्यावर ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil) यांच्यावर एका 29 वर्षीय तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचा आरोप केला आहे. (Thane Crime)
नेमके प्रकरण काय?
तक्रारीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी पृथ्वीराज पाटील यांची ओळख होती. या तरुणीने ठाणे, नवी मुंबई आणि कोल्हापुरातील बंगल्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच, धमकावून कोल्हापुरात गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
या प्रकरणी पीडितेने 7 मार्चला कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या सर्व आरोपांनी राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
पीडितेकडून पुरावे सादर
सदर रुग्णालयाचा अहवाल आणि चॅटिंगचा पुरावा पोलिसांकडे सादर केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.
तसेच, आरोपी पृथ्वीराज हा संजय पाटील यांचा मुलगा असून डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त देखील आहेत. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Title : Thane Crime Rape Case Filed Against Former Minister Nephew