बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”

ठाणे | एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट विरुद्ध शिवसेना असा वाद सध्या पेटला असून दोनही बाजूचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांवर सडकून टिका करत आहेत. यातच खासदार आणि नेते संजय राऊत हे ठिकठिकाणी सभेत शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांचा इतिहास सांगत आहेत. तसेच ज्यांना जायचे आहे त्यांनी खुशाल जा असा आदेशच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

याच पार्श्वभुमीवर ठाणे जिल्हा संघटक आणि ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात आली. यावर ठाण्यातील शिवसेना पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेनेतून आमची कोणीही हाकलपट्टी करु शकत नाही. आम्ही शिवसैनिकच आहोत. आमचे पद अश्या प्रकारे कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि बातम्यांंमध्ये दाखवत असलेले पत्र अजून आमच्या पर्यंत पोहोचले नाही, असे मिनाक्षी शिंदे म्हणाल्या.

पुढे बोलताना शिंदे म्हणाल्या, हाकलपट्टी हा शब्द हास्यास्पद आहे. तुम्ही अश्या प्रकारे जर आमची हाकलपट्टी करणार असाल, तर शिवसेना शाखेला टाळं लावण्यासाठी तरी कोणाला ठेवणार आहात का? असा प्रश्न त्यांनी विचारला. आम्ही आमच्या शिंदे साहेबांमुळे आहोत, आणि पुढेही राहु, अशा संतप्त प्रतिक्रिया टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

कुठलेही पद शास्वत नसते, मझ्याजवळ तीन वर्षांपासून जिल्हा संघटक हे पद आहे. ते कोणत्याही पत्राशिवाय देण्यात आले. फक्त सामनातून तशी बातमी छापुन आली. त्यांना शिवसेनेतून कमी केल्याचे वृत्त शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आले होते. या पत्रावर सचिव खासदार विनायक राऊत यांची सही आहे.

थोडक्यात बातम्या –

भाजपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, म्हणाले…

ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, 30 तारखेला सरकारची बहुमत चाचणी

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?

‘डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, याचा काय अर्थ?’; एकनाथ शिंदेंचा घणाघात

मुकेश अंबानींकडून जिओच्या संचालक पदाचा राजीनामा, आकाश अंबानींना दिली महत्त्वाची जबाबदारी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More