एकनाथ शिंदेही एक दिवस मुख्यमंत्री होऊ शकतात!

ठाणे | सामान्य कार्यकर्ता कसा मोठा होऊ शकतो हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिल्यानंतर स्पष्ट होतं. जिद्द सोडू नका, एक दिवस तुम्हीही मुख्यमंत्री होऊ शकता, असं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी म्हटलंय.

शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे यांचा बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ठाण्याच्या आर्य क्रीडा मंडळ मैदानात सन्मान करण्यात आला. यावेळी मनोहर जोशी बोलत होते.

एकनाथ शिंदे यांना बघितल्यानंतर लगेचच कामे होतात. त्यांना दाढी आहे. या दाढीला घाबरून कामे वेगाने होत असतील, अशा मिश्किल टिपण्णीही त्यांनी यावेळी केली.